प्रश्न

महारेरा इस्टेट एजंट सर्टिफिकेट ऑफ कॉम्पिटन्सी परीक्षा म्हणजे काय? ती कोणी देणे आवश्यक आहे?

महारेरा (रेरा- महाराष्ट्र) ने आता महाराष्ट्रातील सर्व इस्टेट एजंटना महारेरा मध्ये नोंदणी करणे अनिवार्य केले आहे. MahaRERA मध्ये नोंदणी करण्यासाठी, इस्टेट एजंटला इस्टेट एजंटसाठी असलेला प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करणे आणि सर्टिफिकेट ऑफ कॉम्पिटन्सी परीक्षेत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच एजंट नोंदणीसाठी अर्ज करू शकतो.

हा नियम सध्याच्या रिअल इस्टेट एजंट्सना तसेच या क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणाऱ्यांना लागू होतो. रिअल इस्टेट डेव्हलपर्सच्या विक्री विभागातील विक्री कर्मचार्यांना आणि रिअल इस्टेट एजंटांसह काम करणार्या विक्री कर्मचार्यांना देखील याची आवश्यकता आहे. जे लोक रिअल इस्टेटची विक्री किंवा खरेदी करण्यात थेट गुंतलेले असतात, व त्यासाठी त्यांना ग्राहकांशी संवाद साधावा लागतो, अशा सर्व लोकांसाठी ही परीक्षा फायदेशीर ठरते.

सध्याच्या महारेरा इस्टेट एजंट्सच्या नोंदणीचे काय होईल?

जर एजंटने 1 सप्टेंबर 2023 पूर्वी महारेरा इस्टेट एजंट सर्टिफिकेट ऑफ कॉम्पिटन्सी परीक्षा उत्तीर्ण केली तरच त्यासाठी सध्याची महारेरा इस्टेट एजंट नोंदणी वैध राहील. जर इस्टेट एजंट 1 सप्टेंबर 2023 पूर्वी उत्तीर्ण होऊ शकला नाही, तर एजंटला प्रथम परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. आणि नंतर नोंदणीसाठी (परवाना) पुन्हा अर्ज करावा लागेल.

जर नोंदणीकृत एजंट 1 सप्टेंबर 2023 पूर्वी परीक्षा उत्तीर्ण करू शकत नसेल तर काय होईल?

एजंटचा महाराष्ट्रात काम करण्याचा परवाना वैध राहणार नाही. त्याला/तिला प्रथम परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल आणि नंतर परवान्यासाठी (MaRERA कडे नोंदणी) पुन्हा अर्ज करावा लागेल.

इस्टेट एजंट प्रशिक्षण न घेता परीक्षेला बसू शकतो का?

परीक्षेला बसण्यापूर्वी MahaRERA च्या अधिकृत ट्रेनिंग पार्टनर्स घेत असलेला 20 तासांचा ऑनलाइन प्रशिक्षण कोर्स पूर्ण करणे अनिवार्य आहे.

MahaRERA ने CoC प्रशिक्षण अभ्यासक्रम आणि परीक्षा का सुरू केल्या आहेत?

रिअल इस्टेट एजंट हे लोकाभिमुख व्यक्तिमत्व असतात. तसेच, घर खरेदी करणारे किंवा सुपूर्द करणारे, आणि प्रमोटर्स यांच्यातील ते मध्यस्थ असतात. कोणत्याही प्लॉट, अपार्टमेंट युनिट किंवा इमारतीच्या खरेदीच्या प्रत्येक टप्प्यावर, घर खरेदीदार/वाटपकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, वगैर समज किंवा वाद टाळण्यासाठी रिअल इस्टेट एजंटना रिअल इस्टेट व्यवहारांची सर्व समावेशक माहिती असणे आवश्यक आहे, असा सरकारचा विश्वास आहे. सरकारला रिअल इस्टेट एजंट्सच्या पद्धतीं मध्ये सातत्य आणायचे आहे, एजंट चे ज्ञान व नियामक आणि कायदेशीर फ्रेमवर्कची जाणीव वाढवायची आहे, तसेच रिअल इस्टेट एजंट्ससाठी आचार संहिता लागू करायची आहे. याच हेतूने, महाराष्ट्र सरकारने अधिकृत प्रशिक्षण पार्टनर्सद्वारे चालवलेला वीस तासांचा ऑनलाइन कोर्स करणे अनिवार्य केले आहे, त्याच प्रमाणे, महारेरा इस्टेट एजंट सर्टिफिकेट ऑफ कॉम्पिटन्सी परीक्षा देणे व उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे.

महारेरा इस्टेट एजंट सर्टिफिकेट ऑफ कॉम्पिटन्सी परीक्षेसाठी प्रशिक्षण व परीक्षेच्या अभ्यासक्रमात कशाचा समावेश आहे?

रिअल इस्टेट क्षेत्रात कार्यरत असलेल्या नियामक आणि कायदेशीर चौकटीच्या मूलभूत संकल्पना समजून घेण्यावर हा अभ्यासक्रम भर देतो. अभियांत्रिकी आणि आर्किटेक्चरचे तांत्रिक पैलू समजून घेण्यावर देखील लक्ष केंद्रित केले जाते. इस्टेट एजंटला त्याचा/तिचा व्यवसाय योग्य पद्धतीने भरभराटीला आणण्यासाठी हे माहीत असणे आवश्यक आहे. कोर्समध्ये रिअल इस्टेट एजंट्ससाठी आवश्यक असलेल्या सॉफ्ट स्किल्सचाही आढावा घेतला जातो.

महारेरा च्या अधिकृत ट्रेनिंग पार्टनर्सद्वारे घेण्यात येणाऱ्या 20 तासांच्या ऑनलाइन प्रशिक्षण अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेल्या अभ्यासक्रमावर ही परीक्षा आधारित आहे.

परीक्षा कोणत्या भाषेत/भाषांमध्ये घेतली जाते?

परीक्षा इंग्रजी आणि मराठी भाषेत घेतली जाते.

परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवार किती प्रयत्न करू शकतो ?

प्रशिक्षण अभ्यासक्रमानंतर उमेदवार तीन प्रयत्न करू शकतो. जर उमेदवार तीन प्रयत्नांत उत्तीर्ण होऊ शकत नसेल, तर त्याला/तिला पुन्हा प्रशिक्षण कोर्सला उपस्थित राहावे लागेल.

ही एकच परीक्षा आहे का? परीक्षेला एकूण किती गुण दिले जातात? पासिंग कट ऑफ काय आहे?

शंभर गुणांची परीक्षा असते. प्रश्नपत्रिकेत प्रत्येकी दोन गुणांचे पन्नास बहुपर्यायी प्रश्न असतात. उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवाराला 40% गुण मिळणे आवश्यक आहे.

ही ऑनलाइन परीक्षा आहे का?

होय, ही ऑनलाइन परीक्षा आहे. मात्र उमेदवारांना अशी केंद्रे दिली जातील जिथून त्यांना परीक्षेसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहावे लागेल

प्रत्येक प्रयत्नासाठी फी भरावी लागेल का?

प्रत्येक प्रयत्नासाठी परीक्षा फी भरावी लागेल.

प्रशिक्षण अभ्यासक्रमास पुन्हा उपस्थित राहण्यासाठी फी भरावी लागेल का?

होय, प्रशिक्षण अभ्यासक्रमाची पुनरावृत्ती करायची असल्यास फी पुन्हा भरावी लागेल.

परीक्षेचे आयोजन व मूल्यमापन कोण करेल?

IBPS (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) द्वारे ही परीक्षा आयोजित केली जाईल आणि त्याचे मूल्यमापन केले जाईल.

NAR-INDIA ( असोसिएशन ऑफ रिअल्टर्स-इंडिया) हे MahaRERA चे अधिकृत ट्रेनिंग पार्टनर आहेत का?

होय, महारेरा इस्टेट एजंट सर्टिफिकेट ऑफ कॉम्पिटन्सी परीक्षेसाठी ट्रेनिंग घेण्यासाठी NAR-INDIA हे महारेराचे अधिकृत ट्रेनिंग पार्टनर आहेत.

NAR-INDIA R.O.U.T.E. द्वारे कोर्स करण्याचे काय फायदे आहेत?

NAR-INDIA (नॅशनल असोसिएशन ऑफ रिअलटर्स - इंडिया) ही भारतातील रिअल इस्टेट एजंट्सची प्रमुख संस्था आहे आणि त्यामुळे इस्टेट एजंट्सच्या गरजा आणि दृष्टिकोन यांची प्रत्यक्ष जाणीव संस्थेला आहे. दोन दशकांहून अधिक काळ, NAR-INDIA भारतातील रिअल इस्टेट एजंट्सचे प्रतिनिधित्व करण्यात, आणि त्यांच्या समस्या सरकारसह सर्व स्टेकहोल्डर्स समोर प्रभावीपणे मांडण्यात अग्रेसर आहे.

महारेरा इस्टेट एजंट सीओसी परीक्षेसाठीचा NAR-INDIA R.O.U.T.E. प्रशिक्षण अभ्यासक्रम IIRE, NAR-INDIA यांच्या शैक्षणिक शाखेने डिझाइन केला आहे; हे ट्रेनिंग Vayati Systems द्वारे आयोजित केले जाते.रिअल इस्टेट एजंटना विविध स्तरांवर आणि विविध विषयांवर ट्रेनिंग देण्याचा प्रदीर्घ अनुभव IIRE आणि Vayati Systems या दोघांना आहे.

NAR-INDIA R.O.U.T.E ट्रेनिंग कोर्सचा कालावधी किती आहे?

महारेराने अनिवार्य केल्यानुसार, NAR-INDIA R.O.U.T.E. प्रशिक्षण अभ्यासक्रम हा 20 तासांचा लाईव्ह ऑनलाइन कोर्स आहे, त्याचा कालावधी पाच दिवसांचा आहे.

NAR-INDIA R.O.U.T.E या ट्रेनिंग कोर्सच्या अभ्यासक्रमात कशाचा समावेश आहे?

MahaRERA ने महारेरा इस्टेट एजंट सर्टिफिकेशन ऑफ कॉम्पिटन्सी परीक्षेसाठी एक हँडबुक (पुस्तिका) प्रकाशित केले आहे. या हँडबुकमध्ये दिलेला प्रशिक्षणाचा संपूर्ण अभ्यासक्रम NAR-INDIA R.O.U.T.E.मध्ये समाविष्ट आहे.

कोर्स व परीक्षेसाठी ट्रेनिंग मटेरियल कोणते आहे?

R.O.U.T.E. मध्ये नोंदणी केल्यानंतर तुम्हाला अभ्यासक्रमासह महारेरा ट्रेनिंग मटेरियलची सॉफ्ट कॉपी मिळेल.

NAR-INDIA R.O.U.T.E ट्रेनिंग कोर्स मध्ये वापरली जाणारी शिक्षण पद्धती कोणती आहे?

NAR-INDIA R.O.U.T.E. ट्रेनिंग कोर्स मध्ये लाईव्ह टीचिंग सेशन्स, इन्फो-ग्राफिक्स, व्हिडिओ, स्टडी नोट्स आणि मॉक टेस्ट यांचा समावेश आहे.

NAR-INDIA R.O.U.T.E ट्रेनिंग कोर्स मध्ये कोणत्या भाषेतून शिक्षण दिले जाते?

कोर्स इंग्रजीमध्ये घेतला जातो. जेथे शक्य असेल तेथे प्रशिक्षक सहकार्य करतील आणि समजण्यात अडचण आल्यास ते हिंदी/मराठीमध्ये समजावून सांगतील. मात्र, ही बहुभाषिक मदत मर्यादित स्वरूपाची आहे आणि याचा अर्थ असा नाही की अभ्यासक्रम अनेक भाषांमध्ये घेतला जातो.

कोर्सची फी किती आहे?

NAR-इंडिया रु. 5000/- + NAR-INDIA R.O.U.T.E. महारेरा इस्टेट एजंट ट्रेनिंग कोर्स साठी लागू असलेले टॅक्सेस.

NAR-INDIA परीक्षा नोंदणी प्रक्रियेत मदत करते का?

NAR-INDIA R.O.U.T.E. आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना देते आणि उमेदवारांना परीक्षा फॉर्म भरण्यास मदत करते.

ग्रुप किंवा संस्थानसाठी खास सवलत आहे का?

प्रत्येक व्यक्तीसाठी रु. 5000/- + लागू टॅक्स, इतकी फी असून कोणतीही सवलत उपलब्ध नाही.

किती उपस्थिती अनिवार्य आहे? क्लासला उपस्थित राहू न शकल्यास रेकॉर्ड केलेले लेक्चर्स उमेदवाराला दिले जातील का?

75% उपस्थिती अनिवार्य आहे. आम्ही रेकॉर्ड केलेली लेक्चर्स देऊ शकत नाही. मात्र, नोट्स दिल्या जातील.

तुम्हाला आणखी काही शंका असल्यास, तुम्ही आमच्याशी +917353047888 वर संपर्क साधू शकता किंवा आम्हाला route@narindia.com वर लिहू शकता.

अधिक तपशिलांसाठी तुम्ही helpdesk@maharera.mahaonline.gov.in, techoff1@maharera.mahaonline.gov.in वर देखील महारेराशी संपर्क साधू शकता.