Emblem

महारेरा इस्टेट एजंट ट्रेनिंग व परीक्षा

महारेरा इस्टेट एजंट सर्टिफिकेट ऑफ कॉम्पिटन्सी (CoC) ट्रेनिंग व परीक्षा, महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या सर्व इस्टेट एजंट आणि रिअल इस्टेट सेल्स एक्झिक्युटिव्ह साठी अनिवार्य आहेत. (MahaRERA ऑर्डर N.41/2023).

नॅशनल असोसिएशन ऑफ रिअल्टर्स -इंडिया (NAR-INDIA) ही इस्टेट एजंट्स आणि ब्रोकर्स/रिअल्टर्स ची प्रमुख अखिल भारतीय संघटना आहे. NAR-INDIA च्या R.O.U.T.E. इस्टेट एजंट सर्टिफिकेटऑफ कॉम्पिटन्सी (CoC) परीक्षेसाठी हा महारेरा -अधिकृत ट्रेनिंग प्रोग्रॅम आहे.

NAR-INDIA R.O.U.T.E. हा प्रोग्रॅम अनुभवी इस्टेट एजंट आणि ब्रोकर्स आणि कायदा, वित्त, अभियांत्रिकी, आर्किटेक्चर आणि कम्युनिकेशन या विषयातील तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली निर्माण केला आहे. NAR-INDIA ची शिक्षण शाखा असलेल्या IIRE मधील अनुभवी प्रशिक्षकांद्वारे हा प्रोग्रॅम घेतला जातो.

NAR INDIA - IIRE ला इस्टेट एजंट/रिअल्टर्सच्या शिक्षण आणि प्रशिक्षणाचा 20+ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे.

NAR-INDIA R.O.U.T.E.
इस्टेट एजंट्सच्या
यशाचा राजमार्ग

NAR-INDIA R.O.U.T.E. ची आखणी तुम्हाला केवळ परीक्षेतच नव्हे, तर जीवनातही यश संपादन करता यावे या दृष्टीने केलेली आहे! भारतातील अत्यंत अनुभवी व तज्ञ रिअल इस्टेट एजंट्स व ब्रोकर्सद्वारे याची निर्मिती केली असून, सखोल मार्गदर्शन केले जाते.

R.O.U.T.E. चा अभ्यासक्रम महारेराच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार घेतला जातो. समजायला सोपे जावे म्हणून, प्रशिक्षणात कल्पक व सर्जनशील शिक्षण पद्धती वापरल्या जातात. इन्फोग्राफिक्स, व्हिडिओ आणि संदर्भासाठी नोट्स व तज्ञांच्या ऑनलाइन लेक्चर्स या साधनांच्या साहाय्याने शिकविले जाते.

Course Highlights

  • २० तासांचे लाईव्ह ऑनलाईन सेशन्स
  • महारेराने निश्चित केलेल्या सिलॅबसचा अभ्यास
  • अनुभवी इस्टेट एजंट्सकडून माहिती घेऊन IIRE च्या रेराने व निरनिराळ्या विषयातील तज्ञांनी डिझाईन केलेला कोर्स
  • रेराच्या कायदेशीर तरतुदी, रिअल इस्टेटशी संबंधित प्रक्रिया, व इस्टेट एजंट्सना आवश्यक असलेली कौशल्ये यांवर भर
  • जाणकार व अनुभवी ट्रेनर्स
  • प्रत्येक टॉपिक नंतर मॉक टेस्ट

प्रश्न

महारेरा इस्टेट एजंट सर्टिफिकेट ऑफ कॉम्पिटन्सी परीक्षा म्हणजे काय? ती कोणी देणे आवश्यक आहे?

महारेरा (रेरा- महाराष्ट्र) ने आता महाराष्ट्रातील सर्व इस्टेट एजंटना महारेरा मध्ये नोंदणी करणे अनिवार्य केले आहे. MahaRERA मध्ये नोंदणी करण्यासाठी, इस्टेट एजंटला इस्टेट एजंटसाठी असलेला प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करणे आणि सर्टिफिकेट ऑफ कॉम्पिटन्सी परीक्षेत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच एजंट नोंदणीसाठी अर्ज करू शकतो.

हा नियम सध्याच्या रिअल इस्टेट एजंट्सना तसेच या क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणाऱ्यांना लागू होतो. रिअल इस्टेट डेव्हलपर्सच्या विक्री विभागातील विक्री कर्मचार्यांना आणि रिअल इस्टेट एजंटांसह काम करणार्या विक्री कर्मचार्यांना देखील याची आवश्यकता आहे. जे लोक रिअल इस्टेटची विक्री किंवा खरेदी करण्यात थेट गुंतलेले असतात, व त्यासाठी त्यांना ग्राहकांशी संवाद साधावा लागतो, अशा सर्व लोकांसाठी ही परीक्षा फायदेशीर ठरते.

सध्याच्या महारेरा इस्टेट एजंट्सच्या नोंदणीचे काय होईल?

जर एजंटने 1 सप्टेंबर 2023 पूर्वी महारेरा इस्टेट एजंट सर्टिफिकेट ऑफ कॉम्पिटन्सी परीक्षा उत्तीर्ण केली तरच त्यासाठी सध्याची महारेरा इस्टेट एजंट नोंदणी वैध राहील. जर इस्टेट एजंट 1 सप्टेंबर 2023 पूर्वी उत्तीर्ण होऊ शकला नाही, तर एजंटला प्रथम परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. आणि नंतर नोंदणीसाठी (परवाना) पुन्हा अर्ज करावा लागेल.

जर नोंदणीकृत एजंट 1 सप्टेंबर 2023 पूर्वी परीक्षा उत्तीर्ण करू शकत नसेल तर काय होईल?

एजंटचा महाराष्ट्रात काम करण्याचा परवाना वैध राहणार नाही. त्याला/तिला प्रथम परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल आणि नंतर परवान्यासाठी (MaRERA कडे नोंदणी) पुन्हा अर्ज करावा लागेल.

इस्टेट एजंट प्रशिक्षण न घेता परीक्षेला बसू शकतो का?

परीक्षेला बसण्यापूर्वी MahaRERA च्या अधिकृत ट्रेनिंग पार्टनर्स घेत असलेला 20 तासांचा ऑनलाइन प्रशिक्षण कोर्स पूर्ण करणे अनिवार्य आहे.

MahaRERA ने CoC प्रशिक्षण अभ्यासक्रम आणि परीक्षा का सुरू केल्या आहेत?

रिअल इस्टेट एजंट हे लोकाभिमुख व्यक्तिमत्व असतात. तसेच, घर खरेदी करणारे किंवा सुपूर्द करणारे, आणि प्रमोटर्स यांच्यातील ते मध्यस्थ असतात. कोणत्याही प्लॉट, अपार्टमेंट युनिट किंवा इमारतीच्या खरेदीच्या प्रत्येक टप्प्यावर, घर खरेदीदार/वाटपकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, वगैर समज किंवा वाद टाळण्यासाठी रिअल इस्टेट एजंटना रिअल इस्टेट व्यवहारांची सर्व समावेशक माहिती असणे आवश्यक आहे, असा सरकारचा विश्वास आहे. सरकारला रिअल इस्टेट एजंट्सच्या पद्धतीं मध्ये सातत्य आणायचे आहे, एजंट चे ज्ञान व नियामक आणि कायदेशीर फ्रेमवर्कची जाणीव वाढवायची आहे, तसेच रिअल इस्टेट एजंट्ससाठी आचार संहिता लागू करायची आहे. याच हेतूने, महाराष्ट्र सरकारने अधिकृत प्रशिक्षण पार्टनर्सद्वारे चालवलेला वीस तासांचा ऑनलाइन कोर्स करणे अनिवार्य केले आहे, त्याच प्रमाणे, महारेरा इस्टेट एजंट सर्टिफिकेट ऑफ कॉम्पिटन्सी परीक्षा देणे व उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे.